भाषण :- 01.11.2023: महाराष्ट्र राजभवन येथे अनेक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
01.11.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब व तामिळनाडू या राज्यांचा, तसेच अंदमान व निकोबार, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमा अंतर्गत राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस साजरे करण्यात आले. यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठ व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध राज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची लोकगीते व नृत्ये सादर केली. राज्यपालांच्या हस्ते संगीतकार अनू मलिक, ‘बामू’चे प्रकुलगुरु प्रो. श्याम शिरसाठ, एसएनडीटी महिला विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी नितीन प्रभुतेंडुलकर तसेच ‘बामू’चे संपर्क अधिकारी मुस्तजीब खान यांचा सत्कार करण्यात आला.