31.10. 2023: महाराष्ट्र राजभवन येथे जम्मू व काश्मीर, लद्दाख केद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस साजरा
31.10. 2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लद्दाख केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस राजभवन येथे साजरा करण्यात आला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत या केंद्र शासित प्रदेशांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी लद्दाख येथील पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आलेल्या कलाकारांच्या चमूने तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी व युवा कलाकारांनी जम्मू व काश्मीर तसेच लद्दाखच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. लद्दाखचे जाब्रो लोकनृत्य, हाफिजा नृत्य, कव्वाली, माता वैष्णोदेवी गीत, लोकवाद्य संगीत आदी कार्यक्रम सादर करण्यात आले.