30.10.2023 : बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश व तेलंगणा नक्षलग्रस्त भागातील आदिवासी युवकांनी घेतली राज्यपालांची भेट
30.10.2023 : बिहार, झारखंड, तेलंगणा व आंध्रप्रदेश या चार राज्यांमधील नक्षलग्रस्त जिल्ह्यातील २०० आदिवासी युवक – युवतींनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. केंद्रीय युवा मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्र संघटनेने गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधील आदिवासी युवकांसाठी १५ व्या आदिवासी युवक आदान प्रदान कार्यक्रमांचे आयोजन केले असून, या कार्यक्रमांतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधानमंडळाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, नेहरु युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र व गोवा संचालक प्रकाश कुमार मनुरे, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कमांडंट इंद्राणी यादव व नेहरु युवा केंद्राचे उपनगर जिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला व्यासपीठावर उपस्थित होते.