20.10.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत कुपवाड़ा, जम्मू – काश्मीर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रवाना
20.10.2023 : राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कुपवाड़ा, जम्मू – काश्मीर येथे स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा राजभवन मुंबई येथून समारंभपूर्वक रवाना करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रतिमापूजन व रथपूजन करण्यात आले. ‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती’ यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवारा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटच्या सहकार्याने भारत – पाकिस्तान सीमेवर उभारण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’चे विश्वस्त अभयसिंह राजे शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.