17.10.2023 : दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
17.10.2023 : ‘आसियान’ या दक्षिण पूर्व आईयातील दहा देशांच्या संघटनेच्या भारतातील राजदूतांनी तसेच वाणिज्यदूतांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. भारत, विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण पूर्व आशिया देशांमधील व्यापार व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या हेतूने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रुनेई दारूस्सलाम, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड व व्हिएतनाम देशांचे राजदूत तसेच वाणिज्यदूत व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सर्व राजदूतांनी राजभवनात ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. बैठकीचे आयोजन उद्योग विभाग तसेच एमआयडीसीच्या पुढाकाराने करण्यात आले होते.