25.09.2023: राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न
25.09.2023: राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारोह संपन्न झाला. कार्यक्रमाला अणुखनिज अन्वेषण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ बी. सर्वणन, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ उद्धव भोसले, प्रकुलगुरु डॉ जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ दिगंबर नेटके, पालक, अधिष्ठाता, शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते. दीक्षांत समारोहामध्ये १५१८६ स्नातकांना पदव्या व पदव्युत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी १०२ उमेदवारांना पीच.डी. तसेच ५२ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.
25.09.2023: Maharashtra Governor and Chancellor of Universities Ramesh Bais presided over the 26th Annual Convocation of the Swami Ramanand Teerth Marathwada University (SRTMU) Nanded through online mode. Director of Atomic Minerals for Exploration and Research Dr B Saravanan, Vice Chancellor of SRTMU Dr Udhav Bhosle, Pro Vice Chancellor Dr Jogendra Singh Bisen, Registrar Dr Sarjerao Shinde, Director, Board of Examination and Assessment Dr Digambar Netke, Deans and Faculty, parents, alumni and others were present. Degrees, Post Graduate Degrees and diplomas were awarded to 15186 graduating students. In all 102 candidates were awarded Ph.D while 52 students were presented Gold Medals.