06.09.2023: राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे औपचारिक उदघाटन
06.09.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे औपचारिक उदघाटन सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे करण्यात आले. यावेळी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अभ्यासक्रम पूर्ण करुन जर्मनी व जपान येथे नोकरी – प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, रोजगार व नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.