बंद

    26.08.2023 : राज्यपालांनी केले मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे कौतुक

    प्रकाशित तारीख: August 26, 2023

    राज्यपालांनी केले मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे कौतुक

    मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधकांनी मोबाइल, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टवॉच आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या लिथियम-आयन (लि-आयन) बॅटरीजचा पुनर्वापर करण्याची एक किफायतशीर पद्धत विकसित केली असल्याचे समजून आनंद झाला.

    संशोधन चमूने टाकून दिलेल्या ली-आयन बॅटरीपासून उच्च क्षमतेच्या बॅटरी बनवण्याची पद्धत विकसित केली आहे. या अभिनव प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या संशोधक व प्राध्यापकांच्या चमूचे आणि स्वच्छ ऊर्जा अलायन्सचे मनःपूर्वक अभिनंदन.