16.08.2023: राज्यपालांची पुण्यातील ‘बाल कल्याण’ संस्थेला भेट
16.08.2023: राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यातील ‘बाल कल्याण’ संस्थेला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. बाल कल्याण संस्थेने दिव्यांग मुलांच्या विकासासाठी योगदान देत हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले आहे. अशा संस्थांच्या विकासात समाजाने कर्तव्यभावनेने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी राज्यपालांनी केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी व संस्थेच्या अध्यक्षा रामबाई बैस, संस्थेचे मानद सचिव प्रतापराव पवार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा उंटवाल, संस्थेचे विश्वस्त, व्यवस्थापिका अपर्णा पानसे आदी उपस्थित होते.