07.08.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत जमशेदजी टाटा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची अज्ञात गाथा या विषयावरील एक परिसंवाद संपन्न
07.08.2023:'जमशेदजी टाटा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची अज्ञात गाथा' या विषयावरील एका परिसंवादाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'विद्यार्थी विज्ञान मंथन' परीक्षा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुंबई विद्यापीठ तसेच विज्ञान भारती यांनी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने चर्चासत्राचे तसेच प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले. परिसंवादाला अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, सीएसआयआरचे माजी संचालक डॉ शेखर मांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरु प्रा. अजय भामरे तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.
07.08.2023: Governor Ramesh Bais presided over a Seminar on the theme 'Jamsetji Tata : The Unsung Hero of India's Freedom Struggle' at the Convocation Hall of University of Mumbai. The Seminar was organised by University of Mumbai and Vijnana Bharati in collaboration with the Ministry of Culture, Government of India. Former Chairman of Atomic Energy Commission Dr Anil Kakodkar, former Director General of CSIR and President of Vijnana Bharti Dr Shekhar Mande, Vice Chancellor of University of Mumbai Dr Ravindra Kulkarni, Pro Vice Chancellor Prof Ajay Bhamre and others were present.