21.07.2023 : राज्यपालांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावा
२१.०७.२०२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी लोकभवन मुंबई येथे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी एसीएस कृषी अनुप कुमार, आयुक्त कृषी सुनील चव्हाण, प्रकल्प संचालक पीओसीआरए परिमल सिंग, प्रकल्प संचालक स्मार्टग्रा कौस्तुभ दिवेगावकर, संचालक महाबीज सचिन कलंत्रे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
21.07.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी एका उच्च स्तरीय बैठकीत राज्यातील कृषी विभागाच्या विविध केंद्र - पुरस्कृत व राज्य योजनांचा राजभवन येथे आढावा घेतला. कृषी योजनांचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा या दृष्टीने या क्षेत्रासाठी असलेला अर्थसंकल्पीय निधी निर्धारित वेळेत पूर्णपणे खर्चित झाला पाहिजे या दृष्टीने नियोजन करण्याचे राज्यपालांनी सांगितले. बैठकीला कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार, राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह, 'स्मार्ट प्रकल्प' संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.