11.07.2023 : अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
११.०७.२०२३ : २०५ वर्षे जुन्या सेंट लुईस विद्यापीठ, मिसूरी, अमेरिकेतील उच्चस्तरीय शैक्षणिक शिष्टमंडळाने असोसिएट प्रोव्होस्ट एरिक आर्मब्रेक्ट यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांशी सहकार्याच्या संधींबद्दल चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ भारतात आले आहे. ग्लोबल एंगेजमेंटचे असोसिएट उपाध्यक्ष डॉ. लुचेन ली, सल्लागार सुंदर कुमारस्वामी आणि ग्लोबल इनिशिएटिव्हजच्या संचालक अनुशिका जैन उपस्थित होते.
11.07.2023 : अमेरिकेतील मिसौरी येथील २०५- वर्षे जुन्या सेंट लुईस विद्यापीठाचे सहयोगी प्रोव्होस्ट डॉ. एरिक ऍम्ब्रेख्त यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच कुलपती रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. मुंबई विद्यापीठासह महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांसोबत कौशल्य शिक्षणासह विविध विषयांवर सहकार्याची क्षेत्रे ठरविण्यासाठी सेंट लुईस विद्यापीठाचे शिष्टमंडळ भारत भेटीवर आले आहे. यावेळी सेंट लुईस विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे उपाध्यक्ष लूशेन ली, सल्लागार सुंदर कुमारसामी व जागतिक उपक्रम विभागाच्या सहसंचालिका अनुशिका जैन उपस्थित होत्या.