04.07.2023: राज्यपालांनी घेतले राजभवनातील श्रीगुंडी देवीचे दर्शन
04.07.2023: राज्यपाल रमेश बैस यांनी एक दिवसीय श्रीगुंडी यात्रेनिमित्त राजभवनातील श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले.
यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी देवीची आरती केली तसेच भाविकांशी संवाद साधला. आरतीनंतर राज्यपालांनी परिसरातील महालक्ष्मी, दुर्गा, महादेव व हनुमान यांच्या मूर्तींना हार घातला व आपल्या वतीने प्रसाद अर्पण केला. गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी राजभवनातील एक दिवसाची यात्रा भरते.राजभवनातील श्रीगुंडी देवीला साकळाई देवी व सागरमाता या नावांनी देखील ओळखले जाते. पोलीस दलातर्फे यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.