21.06.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत विधान भवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
Zoom 21.06.2023 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र विधान भवन येथे 'योग प्रभात' या योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने आयोजित या योग प्रात्यक्षिक सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार, शासकीय अधिकारी तसेच योगप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी राज्यपालांसह सर्व उपस्थितांनी कैवल्यधाम योग संस्थेचे सहसचिव रवी दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली.
21.06.2023 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र विधान भवन येथे 'योग प्रभात' या योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने आयोजित या योग प्रात्यक्षिक सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार, शासकीय अधिकारी तसेच योगप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी राज्यपालांसह सर्व उपस्थितांनी कैवल्यधाम योग संस्थेचे सहसचिव रवी दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली.