11.06.2023: राज्यपालांच्या हस्ते संस्थेद्वारे आयोजित परंपरा संगीत महोत्सवाचे उदघाटन
11.06.2023: सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने तसेच 'मधू मूर्च्छना' संस्थेद्वारे आयोजित परंपरा संगीत महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रंगशारदा सभागृह, वांद्रे मुंबई येथे संपन्न झाले. ज्येष्ठ गायिका व मधू मूर्च्छना ट्रस्ट संस्थेच्या संस्थापिका डॉ शोमा घोष यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात संगीत व नृत्याच्या माध्यमातून देशाच्या कलावैभवाचा अविष्कार दाखविण्यात आला. संगीताला धर्म, जात व भौगोलिक सीमा नसतात. कोणत्याही भाषेत संगीत असले तरी हृदयाला भिडण्याची शक्ती त्यामध्ये असते असे राज्यपालांनी सांगितले. कार्यक्रमाला माजी मंत्री कृपाशंकर सिंह, अभिनेते धीरज कुमार, विनोद शेलार, अमरजित मिश्र व इतर मान्यवर उपस्थित होते.
11.06.2023: Governor Ramesh Bais inaugurated the 'Parampara Concert' depicting the journey of the Indian Heritage Music through music and dance at Rang Sharda in Mumbai. The programme was organised by the Ministry of Culture in association with 'Madhu Murchhana' an organisation headed by Padmashri Dr Soma Ghosh, Vocalist and Founder Trustee of Madhu Murchana Trust. Speaking on the occasion, the Governor said music has no language, language or region. He said good music has the power to transport the audience to a higher plane. Former Minister Kripa Shankar Singh, actor Dheeraj Kumar, Vinod Shelar, Amarjit Mishra and others were present.