09.06.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत पुणे येथे आयोजित ‘इंडस्ट्री मीट संपन्न
09.06.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत पुणे येथे आयोजित 'इंडस्ट्री मीट संपन्न
09.06.2023 : 'कौशल्य केंद्र आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुणे विभागातील उद्योग समूह व रोजगार प्रदाते यांच्या समवेत आयोजित उद्योग बैठक ('इंडस्ट्री मीट') राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत यशदा पुणे येथे संपन्न झाली. यावेळी रोजगार निर्मितीसाठी सामंजस्य करारांचे आदान प्रदान करण्यात आले. यावेळी स्वाक्षरी करण्यात आलेल्या १.४१ लाख सामंजस्य करारांच्या माध्यमातून पुढील एक वर्षात १.०६ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते 'फिनिशर्स प्लॅटफॉर्म' या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कौशल्य वर्धन व नियुक्ती संदर्भातील डिजिटल उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, आयुक्त डॉ रामास्वामी एन. कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आदी उपस्थित होते.