07.06.2023 : श्री सत्य साईं संजीवनी रिसर्च फाउंडेशन संस्था वर्धापन दिनी राज्यपालांची हजेरी
07.06.2023 : लहान मुलांच्या हृदय रोगावर मोफत उपचार करणाऱ्या श्री सत्य साईं संजीवनी रिसर्च फाउंडेशन या संस्थेचा पाचवा वर्धापन दिवस राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत खारघर, नवी मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस श्रीनिवास, अध्यात्मिक गुरु मधुसूदन साईं, रोहतक येथील पं. बी.डी.शर्मा आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अनिता सक्सेना, माजी वैद्यकीय संचालक डॉ प्रवीण शिनगारे तसेच वैद्यकीय व आरोग्य सेवा क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री सत्य साईं फाउंडेशनच्या वतीने सरकारी कर्मचारी तसेच गरोदर मातांसाठी सार्वजनिक आरोग्य सेवांचा शुभारंभ करण्यात आला. संजीवनी हॉस्पिटल येथून उपचार यशस्वी पूर्ण केलेल्या मुलांना राज्यपालांच्या हस्ते 'गिफ्ट ऑफ लाईफ' प्रमाणपत्र देण्यात आले.