02.06.2023 : विशेष ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना राज्यपालांच्या शुभेच्छा
02.06.2023 : बर्लिन येथे या महिन्यात होत असलेल्या मानसिक दिव्यांग खेळाडूंच्या 'स्पेशल ऑलिम्पिक' मध्ये महाराष्ट्रातून जात असलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे निमंत्रित करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, 'स्पेशल ऑलिम्पिक्स भारत'च्या अध्यक्षा डॉ मल्लिका नड्डा, स्पेशल ऑलिम्पिक्स महाराष्ट्रच्या अध्यक्षा डॉ मेधा सोमैया, व्यवस्थापिका हंसिनी राऊत, उपाध्यक्षा परवीन दासगुप्ता तसेच संस्थेचे पदाधिकारी व माजी खेळाडू यावेळी उपस्थित होते. दिनांक १२ जून ते २५ जून २०२३ या कालावधीत बर्लिन जर्मनी येथे या स्पर्धा होणार आहेत.