18.05.2023 : दिव्यांग ऍबलिम्पिकमधील पदक विजेत्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
18.05.2023 : दिव्यांग व्यक्तींच्या व्यावसायिक कौशल्याच्या ऑलिम्पिक असलेल्या फ्रांस येथे झालेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय ऍबलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक प्राप्त करणाऱ्या दिव्यांग युवक व युवतींचा राज्यपाल रमेश बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते चेतन पाशिलकर, प्रियांका दबडे, भाग्यश्री नडीमेटला-कन्ना व ओंकार देवरुखकर या दिव्यांग विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बाल कल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे, पदक विजेते तसेच त्यांचे पालक व प्रशिक्षक उपस्थित होते.