02.05.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘अहर्निशं सेवामहे’ या ग्रंथाच्या हिंदी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन
02.05.2023: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सव पूर्तीनिमित्त संस्थेच्या ५० वर्षांच्या कार्याची माहिती असलेल्या ‘अहर्निशं सेवामहे’ या ग्रंथाच्या हिंदी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथे करण्यात आले. प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भैयाजी जोशी, उद्योजक आनंद राठी, जनकल्याण समिती कोंकण प्रांताचे अध्यक्ष डॉ अजित मराठे, महानगर संघचालक सुरेश भागेरिया, संस्थेचे आश्रयदाते व निमंत्रित उपस्थित होते.