22.04.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘असेन्डन्स’ या कादंबरीच्या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न
22.04.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'असेन्डन्स' या कादंबरीच्या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न
22.04.2023 : स्तंभलेखिका, ब्लॉगर व आयकर विभागाच्या महासंचालक डॉ. साधना शंकर यांनी लिहिलेल्या 'असेन्डन्स' या विज्ञान कादंबरीचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. कार्यक्रमाला परराष्ट्र सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे, स्तंभ लेखक डॉ. शेषाद्री चारी, गोवानी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवानी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.