07.04.2023: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आरोग्य दिन साजरा
07.04.2023: जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'कार्यालयीन योग' या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हृदयविकाराच्या धक्क्याच्या वेळी वापरावयाचे इमर्जन्सी वैद्यकीय तंत्र या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. योग कार्यशाळेचे आयोजन 'कैवल्यधाम' योग संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. बॉम्बे हॉस्पिटल येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समीर पागड यांनी यावेळी सीपीआर तंत्राचे प्रात्यक्षिक दाखवले. कार्यक्रमाला कैवल्यधामचे विश्वस्त डॉ दिनेश पंजवाणी, योगशिक्षक व कैवल्यधामचे सहसंचालक रवी दीक्षित तसेच राजभवन येथील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
07.04.2023: Governor Ramesh Bais presided over a workshop on 'Yoga at Workplace' organised on the occasion of World Health Day at Raj Bhavan Mumbai. The 'Yoga at Workplace' workshop was conducted by Jt Director of Kaivalyadham Ravi Dixit. Cardiac Surgeon Dr Samir Pagad of Bombay Hospital gave a lecture cum demonstration on 'Cardiopulmonary Resuscitation Technique' (CPR) on the occasion. Dr Dinesh Panjwani, Trustee, Kaivalyadham and officers and staff of Raj Bhavan were present.