25.03.2023 : राज्यपालांच्या हस्ते इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण संपन्न
25.03.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत लघु आणि मध्यम उद्योजकांची प्रमुख संघटना असलेल्या 'एसएमई चेंबर ऑफ इंडिया' या संस्थेचा ३० वा वर्धापन दिवस तसेच इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण मुंबई येथे संपन्न झाले. राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योजक प्रभाकर साळुंके (सुमित ग्रुप पुणे), सीमा सैनी (दालमिया शिक्षण समूह) व सुषमा चोरडिया (सूर्यदत्ता अकादमी) यांना प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देण्यात आले. तसेच युवा उद्योजक अर्पित सिद्धपुरा, ज्येष्ठ उद्योजक ललित चड्ढा, जितेंद्र पटेल, युसूफ कागझी, सोनीर शाह, उदय अधिकारी, विशाल मेहता यांसह २० उद्योजकांना 'इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले.