बंद

    11.02.2023: राज्यपाल झाले निक्षय मित्र; क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट

    प्रकाशित तारीख: February 11, 2023

    राज्यपाल झाले निक्षय मित्र; क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट

    क्षयरोग निर्मुलनाच्या राष्ट्रीय कार्यात लोकसहभाग वाढावा, क्षयरोग रुग्णांना पोषण आहारासाठी मदत व्हावी यादृष्टीने सुरु केलेल्या प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला प्रतिसाद देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे एका क्षयरोग रुग्णाला पौष्टिक आहाराचा संच भेट दिला.

    ‘निक्षय मित्र’ या नात्याने आपण संबंधित क्षयरोग रुग्णाच्या पोषण आहाराची पुढील एक वर्षाकरिता जबाबदारी स्वीकारत असल्याचे राज्यपालांनी यावेळी जाहीर केले.

    राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम सफल करण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था तसेच कॉर्पोरेट क्षेत्राने पुढे येऊन निक्षय मित्र होण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. क्षयरोग रुग्णांना देण्यात येणाऱ्या पौष्टिक आहार संचामध्ये कडधान्य, डाळी, तेल, दूध पावडर, अंडी, फळे व सुकामेवा यांचा समावेश आहे.

    यावेळी बृहन्मुंबईचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेश पाटील, राज्यपालांचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसाद शिंदे, डी व ई वॉर्ड क्षयरोग अधिकारी डॉ ओंकार तोडकरी, डॉ पृथ्वीराज राजोळे व श्री. शशांक बंडकर उपस्थित होते.