11.02.2023: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत एचएसएनसी विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह संपन्न
11.02.2023 : हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह राज्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात सभागृहात संपन्न झाला. राज्यपालांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील १५ गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदक तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दीक्षांत समारोहाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसेच जागतिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकर हे विशेष अतिथी तसेच एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ निरंजन हिरानंदानी, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष अनिल हरीश, कुलसचिव भगवान बालानी, परीक्षा मंडळाचे संचालक एम एन जस्टीन, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच स्नातक उपस्थित होते.
11.02.2023: Governor and Chancellor of public universities in the State Bhagat Singh Koshyari presided over the first Annual Convocation of the Hyderabad (Sind) National Collegiate (HSNC) State Cluster University at K C College auditorium in Mumbai. Gold Medals and Certificates of merit were presented to 15 toppers from various disciplines. Eminent Science leader and President of Global Research Alliance Padma Vibhushan Dr R A Mashelkar, Provost of HSNC University Dr. Niranjan Hiranandani, Vice Chancellor Prof. Hemlata Bagla, President of HSNC Board Anil Harish, Registrar Bhagwan Balani, Director of Examination and Evaluation M. N. Justin, Principals of Colleges, teachers and graduating students were present.