बंद

    12.01.2023 : राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांना राज्यपालांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख: January 12, 2023

    राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांना राज्यपालांचे अभिवादन

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज राजभवन येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

    राज्यपालांनी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पाजंली अर्पण करुन अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल उपसचिव प्राची जांभेकर तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.