08.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘महा ऍग्रोव्हिजन २०२२’ संमेलनाचे उदघाटन संपन्न
08.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'महा ऍग्रोव्हिजन २०२२' संमेलनाचे उदघाटन संपन्न
08.12.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत 'महा ऍग्रोव्हिजन २०२२' हे 'नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती: जागतिक परिप्रेक्ष्य आणि कृषी उद्योग' या विषयावरील तिसऱ्या क्षेत्रीय संमेलनाचे उदघाटन संपन्न झाले. संमेलनाचे आयोजन 'अग्रिव्हिजन' या संस्थेने महात्मा फुले कृषी विद्यापीठ व विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्या सहकार्याने केले आहे. उदघाटन सत्राला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, गुजरात नॅचरल अँड ऑरगॅनिक फार्मिंग अँड ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आनंदचे कुलगुरु डॉ. सी. के. टिंबाडिया, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महा ॲग्रीव्हिजनचे आयोजन सचिव जयंत उत्तरवार, संयोजक मनीष फाटे, कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कृषी संशोधक, कृषी उद्योजक व विद्यार्थी उपस्थित होते.