18.11.2022: राज्यपालांच्या उपस्थितीत महा द्रव्यवर्ती सहस्त्र ब्रह्म कलश अभिषेक महोत्सवाला सुरुवात
18.11.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडारकर रोड, माटुंगा, मुंबई येथील आस्तिक समाजाच्या कोचू गुरुवायूर मंदिर येथे महा द्रव्यवर्ती सहस्त्र ब्रह्म कलश अभिषेक महोत्सवाला सुरुवात झाली. सुरुवातीला राज्यपालांनी मंदिरातील सर्व देवीदेवतांची दर्शन घेतले व उपस्थितांशी संवाद साधला. ज्येष्ठ पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी यावेळी कृष्णभजन व नामसंकीर्तन सादर केले. दि. १८ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी गुरुवायूर केरळ येथील श्री कृष्ण मंदिराचे मुख्य तंत्री पी सी दिनेशन नम्बुदिरीपाद, ज्येष्ठ पार्श्वगायक शंकर महादेवन, आस्तिक समाज देवस्थानचे अध्यक्ष वेंकटरमण, सचिव पी व्ही रामास्वामी, विश्वस्त सी एस परमेश्वर व भाविक उपस्थित होते.
18.11.2022: Governor Bhagat Singh Koshyari attended the inauguration of a 7 - day long Maha Dravyavarti Sahastra Brahma Kalash Abhishekam ritual at the Aasthik Samaj's Kochu Guruvayoor Temple at Bhandarkar Road, Matunga, Mumbai. The Governor had the darshan of all the Gods and Goddesses in the temple and interacted with devotees. Well known playback singer Shankar Mahadevan sang the Krishna Bhajan and Nama Sankirtana on the occasion. The Chief Tanthri of the Shri Krishna Guruvayoor Temple in Kerala P C Dinesan Namboothiripad, Chairman of the Asthika Samaj Temple Ventakaraman, Secretary P V Famaswamy, Trustee C S Parameshwar and devotees were present.