17.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय सागरी परिषद व प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न
17.11.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ व्या आंतरराष्ट्रीय सागरी परिषद (इनमार्को २०२२) व प्रदर्शनाचे मुंबई येथे उदघाटन संपन्न झाले. परिषदेचे आयोजन भारतीय नौवहन महासंचालनालय व इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनीअर्स (इंडिया) या संस्थांनी केले आहे. या त्रिदिवसीय परिषदेचा मुख्य विषय 'शाश्वत भविष्यासाठी हरित सागरी विश्व' हा असून नौवहन उद्योगाशी निगडित विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था व तज्ज्ञ परिषदेत सहभागी होत आहेत. सागरी विश्वातून होणारे ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने परिषदेत विचारमंथन होणार आहे.