06.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत अहिंसा विश्व भारती व विश्व शांती केंद्राचे चर्चासत्र संपन्न
06.11.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत अहिंसा विश्व भारती व विश्व शांती केंद्र स्थापना दिवसाचे औचित्य साधून ‘राष्ट्र निर्मितीमध्ये संतांचे व सामाजिक संस्थांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन संपन्न झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, संजय घोडावत फाउंडेशनचे अध्यक्ष संजय घोडावत व पूज्य गुरुदेवश्री राकेश जी यांच्या अनुपस्थितीत त्यांचे प्रतिनिधी आत्म प्रीत नेमि यांना अहिंसा आतंरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, आचार्य डॉ लोकेश मुनी, जयंत जैन व इतर निमंत्रित उपस्थित होते.