16.10.2022 : महाराष्ट्र राज्य स्टार्टअप सप्ताहाचा राजभवन येथे शानदार समारोप
१६.१०.२०२२ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकभवन मुंबई येथे महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२२ च्या महासमापन सोहळ्याला उपस्थिती लावली. राज्यपालांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य आणि पर्यटन मंत्री यांच्यासमवेत महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२२ आणि महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या विजेत्यांचा सत्कार केला.
16.10.2022 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आयोजित ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह' 2022 तसेच 'महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’ विजेता सन्मान सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा २०२२ पुरस्कार प्रदान करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०२२ पुरस्कार प्रदान करण्यात आले.