13.10.2022 : राज्यपालांच्या हस्ते राज्यातील निवडक प्रसृतीतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांचा सत्कार
१३.१०.२०२२ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकभवन मुंबई येथे आयोजित एका सत्कार समारंभात महिला आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञांचा सत्कार केला. महाराष्ट्र प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना (AMOGS) या राज्यस्तरीय संस्थेने हा सत्कार आयोजित केला होता. या संस्थेत राज्यभरातील ४२ संस्थांचा समावेश आहे. राज्यपालांनी डॉ. हृषिकेश पै, डॉ. शिवकुमार उत्तुरे, डॉ. अनिल पाचणेकर, डॉ. आशा दलाल, डॉ. अमेय पुरंदरे, डॉ. रोहन पालशेतकर आणि इतरांचा याप्रसंगी सत्कार केला.
13.10.2022 : महिला आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील निवडक प्रसृतीतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे सत्कार करण्यात आला. द असोसिएशन ऑफ ऑबस्टेट्रीक अँड गायनाकॉलॉजीकल सोसायटीज (AMOGS) या प्रसृतीतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांच्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने यावेळी ३५ तज्ज्ञ व डॉक्टरांना 'AMOGS - We for स्त्री' पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ हृषिकेश पै, डॉ शिवकुमार उत्तुरे, डॉ आशा दलाल, डॉ अनिल पाचणेकर, डॉ अमेय पुरंदरे, डॉ अनि बी, डॉ आशा दलाल, डॉ रोहन पालशेतकर आदींचा हस्ते सत्कार करण्यात आला.