17.09.2022 : ‘स्वच्छ समुद्र सुरक्षित समुद्र’ अभियानाचा समारोप राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
17.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्वच्छ समुद्र सुरक्षित समुद्र’ या ७५ दिवसांच्या अभियानाचा समारोप आज जुहू चौपाटी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला खासदार पुनम महाजन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक डॉ. वी. एस. पठानिया, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, सतिश मोढ व कोस्ट गार्ड, एन सी सी तसेच विविध सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक उपस्थित होते.