03.09.2022: राज्यपालांच्या हस्ते सिंघानिया एज्युकेशन एक्सलन्स पुरस्कार प्रदान
03.09.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्यातील विविध शिक्षण संस्थांच्या प्रमुखांना तसेच प्राचार्यांना राजभवन मुंबई येथे ‘सिंघानिया एज्युकेशन एक्सलन्स पुरस्कार २०२२’. हे पुरस्कार सिंघानिया एज्युकेशन या संस्थेतर्फे देण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते एनईपी रेडी स्पेक्ट्रम कार्यक्रमाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला सिंघानिया एज्युकेशनचे मुख्य अधिकारी डॉ ब्रिजेश कारिया, रेमंडचे संचालक एस एल पोखरणा व श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या प्राचार्या रेवती श्रीनिवासन उपस्थित होते. यावेळी फादर एब्राहम जोसफ, प्राचार्या ऍलिस बॅरेटो, अमी बिलिमोरिया, अरमैती इंजिनिअर, बिनायफर कुटार, दीपशिखा श्रीवास्तव, यांसह ४८ संस्था प्रमुख व प्राचार्यांना सन्मानित करण्यात आले.