बंद

    09.08.2022: राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार राजभवन येथे संपन्न

    प्रकाशित तारीख: August 9, 2022

    राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार राजभवन येथे संपन्न

    विजयकुमार गावित, संजय राठोड, सुरेश खाडे, तानाजी सावंत, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांसह १८ जणांना मंत्री पदाची शपथ

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या पहिल्या विस्तारात १८ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली.

    राजभवनातील दरबार हॉल येथे मंगळवारी (दि. ९) रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

    यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई व मंगलप्रभात लोढा यांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली.

    शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, रावसाहेब दानवे, कपिल पाटील व डॉ भागवत कराड, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि इतर निमंत्रित उपस्थित होते.