07.08.2022 : महिलांच्या दुचाकी तिरंगा रॅलीला राज्यपालांनी दाखवला हिरवा झेंडा
07.08.2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित महिलांच्या दुचाकी तिरंगा रॅलीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन मुंबई येथून झेंडा दाखवून रवाना केले. अंकीबाई घमंडीबाई गोवाणी ट्रस्टच्या वतीने महिलांच्या दुचाकी वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली राजभवन येथून वरळी कडे रवाना झाली. यावेळी ट्रस्टच्या मुख्य विश्वस्त निदर्शना गोवाणी, अॅड. गौरी छाब्रिया, किन्नर मा ट्रस्टच्या सलमा खान, अभिनेत्री मृणाल देशराज आदी उपस्थित होते.