02.08.2022: गुजराती सांस्कृतिक फोरमच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
02.08.2022: गुजराती सांस्कृतिक फोरम या मुंबईतील सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ प्रसिद्ध गुजराती व्यक्तींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मानित करण्यात आले.राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी, जन्मभूमी समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास, नेत्र चिकित्सक डॉ कुलीन कोठारी, प्रसिद्ध नाट्यलेखक प्रवीण सोळंकी, कमला मेहता अंधशाळेच्या अध्यक्षा हंसाबेन मेहता, नेहरू तारांगणचे माजी संचालक डॉ जे जे रावल, आदींना सन्मानित करण्यात आले.