21.06.2022: राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस
21.06.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला ३० देशांचे राजनैतिक व व्यापार प्रतिनिधी तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या शिष्यवृत्तीवर भारतात शिक्षण घेत असलेले विविध देशांचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ‘द योग इन्स्टिट्यूट’च्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगासने केली.