27.04.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘दिव्य कला शक्ती : दिव्यांगतेतून क्षमतांचे दर्शन’ चे उदघाटन
27.04.2022 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम क्षेत्रातील सहा राज्यांमधील दिव्यांग मुले व युवकांच्या ‘दिव्य कला शक्ती : दिव्यांगतेतून क्षमतांचे दर्शन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन नेहरू केंद्र मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी व्हिडीओ माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले तर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या सचिव अंजली भावरा व सहसचिव राजेश कुमार यादव प्रामुख्याने उपस्थित होते.