15.04.2022 : राज्यपालांचे आंबेडकर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना चहापानाचे आमंत्रण
15.04.2022 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती तसेच महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमांचे विविध शासन संस्थांच्या सहकार्याने शिस्तबद्ध संयोजन करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे चहापानासाठी निमंत्रित करून कौतुकाची थाप दिली. यावेळी माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर, भदंत राहुल बोधी, समन्वय समितीचे महेंद्र साळवे, महासचिव नागसेन कांबळे, लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे, ऍड अभया सोनवणे, अनुराधा रोकडे, स्नेहा भालेराव यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.