बंद

    01.04.2022: गुढीपाडव्यानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: April 1, 2022

    गुढीपाडव्यानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुढीपाडवा तसेच नूतन वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    करोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर यंदा गुढीपाडवा तसेच नववर्षाचे स्वागत सर्वांना पारंपरिक उत्साहाने व निर्भयपणे साजरे करता येणार आहे याचा खूप आनंद होत आहे. हा मंगल दिवस तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.