15.03.2022: राज्यपालांच्या हस्ते लोकमत कल्याण – डोंबिवली गौरव सन्मान प्रदान
15.03.2022: लोकमत समूहातर्फे देण्यात येणारे लोकमत कल्याण - डोंबिवली गौरव पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राजकारण, समाजकार्य, कला, शिक्षण, साहित्य व उद्योग या क्षेत्रातील ५० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, रिजन्सी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक महेश अगरवाल, लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी, कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
15.03.2022: Governor Bhagat Singh Koshyari presented the Lokmat Kalyan- Dombivali Gaurav puraskars to 50 exceptional achievers from Kalyan Dombivali at a function held at Raj Bhavan Mumbai. Joint Managing Director of Lokmat Rishi Darda, Managing Director of Regency Group Mahesh Agarwal, Editor Atul Kulkarni, Commissioner of Kalyan Dombivali Municipal Corporation Dr Vijay Suryawanshi and actor Aishwarya Narkar were prominent among those present.