04.12.2021: नौदल दिनानिमित्त आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’
नौदल दिनानिमित्त आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’
भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडतर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे नौदल दिनानिमित्त आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल अजेंन्द्र बहादूर सिंह यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सन १९७१ च्या भारत – पाक युद्धादरम्यान चार डिसेंबर रोजी कराची बंदरावर हल्ल्याचे ‘ऑपरेशन ट्रायडन्ट’ भारतीय नौदलाने राबविले होते. या हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.