15.11.2021 : राज्यपालांच्या हस्ते मासिक हिंदी विवेकच्या उत्तराखंड विशेषांकाचे प्रकाशन संपन्न
15.11.2021 : उत्तराखंड राज्याच्या साहित्य, संस्कृती, इतिहास व पर्यटनाचे दर्शन घडविणाऱ्या हिंदी मासिक विवेकच्या उत्तराखंड विषयक दिवाळी विशेषांकाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. ‘उत्तराखंड देवभूमि से विकासभूमि’ विशेषांक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, उद्योजक पद्मभूषण रज्जूभाई श्रॉफ, हिंदी विवेकचे व्यवस्थापकीय संचालक अमोल पेडणेकर, कार्यकारी संपादक पल्लवी अनवेकर तसेच मूळतः उत्तराखंड राज्यातील व आता महाराष्ट्र निवासी असलेले गणमान्य लोक उपस्थित होते.