17.10.2021: राज्यपालांच्या उपस्थितीत मानसिक आरोग्य या विषयावरील चर्चासत्र संपन्न
17.10.2021: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे ‘मानसिक आरोग्य समस्या : एक वाढती चिंता’ या विषयावरील चर्चासत्र व वेबिनार संपन्न झाले. मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीच्या हेतूने आयोजित या चर्चासत्राचे आयोजन बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीतर्फे करण्यात आले. चर्चासत्राला सिंगापूरचे मुंबईतील वाणिज्यदूत मिंग फूंग, इझ्रायलचे वाणिज्यदूत कोबी शोशानी, हिंदूजा समूहाचे कॅर्नल प्रभात सूद, मानसोपचार तज्ञ डॉ केर्सी चावडा, बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ अविनाश डिसुझा, माजी अध्यक्षा डॉ अनिता सुखवाणी, डॉ अविनाश सुपे, डॉ संजय कुमावत आदी उपस्थित होते.