02.08.2021: साई लीला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
02.08.2021: युवकांमध्ये कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या साई लीला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने करोना काळात प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करणाऱ्या ३० करोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री व गोरेगाव येथील आमदार विद्या ठाकूर, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढा, साई लीला फाउंडेशनच्या अध्यक्षा रश्मी उपाध्याय, विश्वस्त महेश शेट्टी आदि उपस्थित होते.