23.07.2021: कवयित्री डॉ मंजूषा कुलकर्णी यांचा जागतिक काव्य विक्रम केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सत्कार
23.07.2021: प्रसिद्ध साहित्यिक आणि कवयित्री डॉ.मंजूषा कुलकर्णी यांनी कमी काळात अधिकाधिक काव्यरचना केल्याबद्दल ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ तर्फे त्यांच्या काव्यविक्रमाची नोंद घेण्यात आली आहे. त्यानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक, पं. अतुल शास्त्री भगरे गुरुजी, अभिनेते व नाट्यनिर्माते प्रशांत दामले, संगीतकार कौशल इनामदार प्रामुख्याने उपस्थित होते.