26.05.2021 : राज्यपालांचे बुद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादन
26.05.2021 : बुद्धपौर्णिमेनिमित्त राज भवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भगवान बुध्दांच्या मुर्तीला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी केंद्रीय समाज कल्याण व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले,उदयोजिका कल्पना सरोज तसेच बौध्द भंते उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते भगवान बुध्द यांच्या जीवनावरील चित्रकृतींचा समावेश असलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. रामदास आठवले यांनी राज्यपालांना भगवान बुध्दांची प्रतिमा भेट दिली. राज्यपालांच्या हस्ते भंतेना चिवरदान करण्यात आले.