20.04.2021 : ‘राम – रामायण तीर्थाटन के आयाम’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न
२०.०४.२०२१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'राम - रामायण - तीर्थातन के आयम' या पुस्तकाचे लोकभवन, मुंबई येथून ऑनलाइन प्रकाशन झाले. डॉ. अनंत दीनानाथ दुबे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विविध देशांमधील भगवान राम आणि रामायण संस्कृतीशी संबंधित ठिकाणांचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक इंडिका इन्फोमीडियाने प्रकाशित केले आहे.
20.04.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत डॉ. अनंत दीनानाथ दुबे लिखीत ‘राम-रामायण तीर्थाटन के आयाम’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानन्द जोशी, डॉ. राममनोहर लोहिया अवध विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. मनोज दीक्षित, जीवाजी विद्यापीठ पुरातत्व विभागाचे निवृत्त अध्यक्ष प्रो. राम अवतार शर्मा, डॉ. रमेश चन्द्र गौड़ आदी उपस्थित होते.