14.04.2021 : आंबेडकर जयंती निमित्त राजभवन येथे राज्यपालांचे महामानवालाअभिवादन
१४.०४.२०२१ : डॉ. आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त लोकभवन, मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी राज्यपालांनी मेणबत्ती प्रज्वलित करून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण केली.
14.04.2021: राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन, मुंबई येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपली आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी दीपप्रज्वलन करून महामानवाला अभिवादन केले. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, परिवार प्रबंधक राकेश नैथानी यांचेसह राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपली आदरांजली वाहिली.